- 
                            दि. ७ मे २०२५ १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा – जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांचा भव्य सन्मान !मंत्रिमंडळ सभागृह, मंत्रालय, मुंबई – मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी यांना 100 दिवस कृती कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात 3 रा क्रमांक मिळविल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. विशेष अभिनंदन – जळगाव जिल्हा पोलीस दलाने 100 दिवस कृती कार्यक्रमामध्ये खालील मुद्द्यांवर उत्कृष्ट कामगिरी केली. नागरिकांसाठी User friendly website बनविणे, नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी जलद पारपत्र व चारित्र्य पडताळणी प्रक्रिया, नागरिकांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्यासाठी तक्रार निवारण दिवस राबवणे, QR code द्वारे जिल्ह्यातून कुठूनही ऑनलाईन तक्रार नोंदवणे, प्रत्येक कार्यालय व पोलीस ठाण्यात अभ्यागतांच्या सुलभतेसाठी अभ्यागत मदत कक्ष उभारणे, पोलीस ठाण्यात वर्षानुवर्ष पडून असलेल्या निरुपयोगी वाहनांची त्वरित निर्गती करून परिसर स्वच्छता, मुदतबाह्य अभिलेखांचे निर्लेखीकरण, पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी Top Cop Of The Month संकल्पना राबवणे, इत्यादी विभागातून चांगली कामगिरी केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून जळगाव जिल्हा पोलीस दलाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे..त्याबद्दल संपूर्ण जळगाव जिल्हा पोलीस दलाचे मनःपूर्वक अभिनंदन. नागरिकांच्या सेवेसाठी जळगाव जिल्हा पोलीस दल सदैव तत्पर आहे! 
 
 
                                             
                         
             
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                    